महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री म्हणतात...तर राहुल गांधींची सभा आयोजित करा - चांदूर रेल्वे मतदारसंघ

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कसेबसे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी एक दोन सभा घेतल्या. त्यांच्या सभा ऐकल्यावर मला फार आनंद झाला. त्यांच्या सभा भाजपच्याच फायद्याच्या होत्या. खरतर भाजपची सीट हमखास निवडून आणायची असेल तर मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा आयोजित करायला हवी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांदूर रेल्वे येथे आयोजित केलेल्या सभेत म्हणाले.

मुख्यमंत्री

By

Published : Oct 14, 2019, 4:10 PM IST

अमरावती - विधानसभा निवडणुकीत काही मजा येत नाही. विरोधी पक्ष गारद झाला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात बँकॉकला गेलेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी कसेबसे महाराष्ट्रात आले आणि त्यांनी एक दोन सभा घेतल्या. त्यांच्या सभा ऐकल्यावर मला फार आनंद झाला. त्यांच्या सभा भाजपच्याच फायद्याच्या होत्या. खरतर भाजपची सीट हमखास निवडून आणायची असेल तर मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा आयोजित करायला हवी, अशी उपहासात्मक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांदूर रेल्वे येथे आयोजित केलेल्या सभेत केली.

मुख्यमंत्री

हेही वाचा - निवडणुकीतले 'बाप'माणूस; मुलांसाठी करतायेत जीवाचं रान

चांदूर रेल्वे मतदारसंघात आज भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी सभा मंचावर प्रताप अडसड यांच्यासह विधानपरिषद सदस्य अरुण अडसड, खासदार रामदास तडस, अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, रविराज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, विधानसभा निवडणूक जाहीर झाली आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले. काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांना निदान तोंड दाखवायसाठी तरी महाराष्ट्रात या अशी विनंती केली. यामुळे राहुल गांधी यांनी एक दोन सभा महाराष्ट्रात घेतल्या. या सभेत राहुल गांधी जे काही बोलले त्यावरून असे लक्षात येते की त्यांच्या भाषणाची टेप अद्यापही लोकसभा निवडणुकीवरच अडकली आहे. देशाचा 70 वर्षात कुठलाच विकास झाला नाही, असे वक्तव्य राहुल गांधी भाषणात करत आहेत. मी प्रताप अडसड यांना सांगितले की, तुम्हाला निवडून यायचे असेल तर मतदारसंघात राहुल गांधी यांची सभा घ्या. आपला विजय हमखास होईल. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे जाहीर सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला.

विदर्भाच्या विकासासाठी थेट मुंबई आणि मुंबईच्या समुद्राशी जोडणारा समृद्धी विकास महामार्ग बांधण्याचा निर्णय मी घेतला. या महामार्गाला इथल्या आमदारांनी विरोध केला. या आमदारांना विकास नकोय. या आमदाराच्या भूमिकेला जनतेने साथ दिली नाही. आता चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या समृद्धीसाठी प्रताप अडसड यांना निवडून देण्याचे आवहान मुख्यमंत्र्यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details