महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'काँग्रेस अध्यक्षांनी कधीचेच मैदान सोडले, तर राष्ट्रवादी खाली होण्याच्या मार्गावर'

अमरावतीमधील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 12, 2019, 6:36 PM IST

अमरावती - काँग्रेसचे अध्यक्ष विधानसभा निवडणुकीत कुठेच दिसत नाही. त्यांनी केव्हाच मैदान सोडले आहे, तर राष्ट्रवादी पक्ष खाली होण्याच्या मार्गावर असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

'काँग्रेस अध्यक्षांनी कधीचेच मैदान सोडले, तर राष्ट्रवादी खाली होण्याच्या मार्गावर'

आमचे पैलवान कधीचे तेल लावून बसलेले आहेत. मात्र, आता मैदानात आता कुठलाच प्रतिस्पर्धी उरलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये युतीचे सरकार येणार आहे. फक्त युतीच्या २२०, की २४० जागा येतील हे सांगता येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट झाली आहे, तर 25 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार येणार नाही. त्यांनी फक्त आश्वासने दिली आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी भाजप आहे. गेल्या ५ वर्षात सर्व प्रश्न सुटले, असा दावा करत नाही. मात्र, 5 वर्षात जे झाले ते 15 वर्षात झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details