महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानवर हल्लावेळी रॉकेट सोबत काँग्रेस नेत्यांना पाठवायला हवे - मुख्यमंत्री - country

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ ते बोलत होते. काँग्रेस पक्ष विकासविरोधी आहे.

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर आरोप

By

Published : Apr 7, 2019, 11:40 AM IST

अमरावती - भारत देश संकटात असताना काँग्रेस पक्षाने पाकिस्तानवरील हल्ल्याचे पुरावे मागितले. काँग्रेस पक्ष भारतीय जवानांवर संशय घेऊ लागला आहे. काँग्रेस पक्ष सैन्यावर राजकारण करीत आहे. आता हल्लाचे पुरावे मागता ज्या वेळी पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळी हल्लाच्या वेळी रॉकेट सोबत एखाद्या काँग्रेस नेत्यांना पाठवले असते तर पुरावे मिळाले असते, असा जोरदार हल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर आरोप


अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ ते बोलत होते. काँग्रेस पक्ष विकासविरोधी आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने देशाचे वाटोळे केले. देशातील भाजप सरकारने गरिबांच्या पाठीशी आहे. मुद्दा योजनेत युवकांना रोजगारासाठी कर्ज मिळाले,पीएम किसान योजना शेतकऱ्यासाठी आणली, ऐतिहासिक कर्ज माफी केली, आयुष्यमान भारत योजना आणून रुग्णांना दिलासा मिळाला, आतापर्यंत विदर्भातील लोकांवर अन्याय झाला होता, मात्र मी विदर्भातील मुख्यमंत्री असल्याने आता तो अन्याय होऊ देणार नाही, त्यामुळे देशातील मजबूत सरकार हे मोदींच्या नेतृत्वात पुन्हा येऊ द्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहली त्या प्रमाने या मजबूत संविधानाने सरकार चालत आहे. काँग्रेसने विकासासाठी काही केले नाही, काँग्रेस विकास विरोधात आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यावेळी मंचावर वर्धा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रामदास तडस, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अरुण अडसळसह आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details