अमरावती - शहर आणि जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात सर्वत्र आज सकाळपासुन रिमझिम पाऊस पडतो आहे. अमरावती शहरालगतच्या काही भागांत मात्र मागील 24 तासांत चांगल्या स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे.
अमरावतीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे अमरावती जिल्ह्यात 1 जून ते 26 जून दरम्यान 386.8 मी. मि. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात फक्त 204 मी. मि. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. अचलपूर, चिखलदरा तालुक्यांत चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदुर रेल्वे ,धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव तालुक्यांत अजुनही पावसाची प्रतीक्षा आहे. मागील 24 तासांपासून अमरावती तालुक्यात 32.3 मी.मि. पाऊस कोसळला. तर भातकुली तालुक्यात 13.8 मी. मि. , नांदगाव खंडेश्वर 5 मी. मि. , तिवसा 45.5 मी. मि. आणि अंजनगाव तालुक्यात 59.5 मी. मि पाऊस झाला. हवामान खात्याने येत्या 24 तासात दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.