अमरावती- महापालिकेचे सफाई कर्मचारी शहराच्या विविध भागात सफाई करण्याच्या नावावर सकाळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याचे दिसातात. मात्र, बोटावर मोजण्याइतकेच सफाई कर्मचारी प्रभागात सफाई करतात. इतरजण सकाळी-सकाळी मद्य पार्टीत रंगून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सफाई ऐवजी कर्मचाऱ्यांची पहाटेच रंगते मद्य पार्टी हेही वाचा - अमरावतीत चांदूर रेल्वे बायपास चेक पोस्टवर ७ लाखांची रोकड जप्त
अमरावती महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात सफाईचे कंत्राट दिले आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे शहरातील सफाईच्या कामाकडे लक्ष नाही. महापालिका आयुक्तांनी कधीही अमरावती शहराच्या कुठल्याही भागात स्वतःहून फेरफटका मारला नाही, असे असताना शहराच्या विविध भागांमध्ये पहाटे साडेपाच वाजता मोठ्या संख्येने एकत्र येणारे सफाई कर्मचारी हजेरी लावतात. त्यानंतर मद्यपार्टी करण्यात दंग होतात. ही घटना गाडगेनगर परिसरातील जयंत कॉम्प्लेक्स येथील पहिल्या माळ्यावर नियमित पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - बडनेरा मतदारसंघात... 'राणा को हटाओ राणी को लाओ'च्या घोषणा!
परिसरातील काही सुज्ञ नागरिकांनी याठिकाणी सकाळी नियमित रंगणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची मद्य पार्टीचा व्हिडिओ केला आहे. तर हा प्रकार केवळ गाडगेनगर परिसरातच नव्हे, तर शहरातील अनेक प्रभागांमध्ये चालतो, असा आरोप अनेक भागातील नागरिकांनी केला आहे.