अमरावती : दिवसेंदिवस लम्पीचा कहर वाढत असून पशुधनाच्या मृत्यूमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला अटकाव करण्यासाठी राज्यभर पशुसंवर्धन विभागांनी 'माझा गोठा स्वच्छ गोठा ' ही मोहीम सुरू केली ( clean cowshed mission ) आहे. ७ नोव्हेंबर ते ६ डिसेबर या महिन्याभराच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत ( Animal Husbandry Department ) आहे.
Clean Cowshed Mission : लम्पीला रोखण्यासाठी पशू संवर्धन विभागाचे स्वच्छ गोठा मिशन - लम्पी टाळण्यासाठी गोठा स्वच्छ अभियान
राज्यभर पशुसंवर्धन विभागांनी 'माझा गोठा स्वच्छ गोठा ' ही मोहीम सुरू केली ( clean cowshed mission ) आहे. लम्पी आजाराचा अटकाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागांनी स्वच्छ गोठा मिशन सुरू केले आहे.
७ नोव्हेंबर ते ६ डिसेबर पर्यंत मोहीम :जिल्हाधिकारी पवनीत कौर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके यांच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू करण्यात आली. जिल्ह्यात लम्पी बाधितांचा आकडा २४ हजारांच्या घरात गेला आहे. त्यातील जवळपास १ हजार ६०० जनावरे लम्पीने मृत्युमुखी पडली आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पाऊस सुरू असल्याने जनावरांची प्रतिकारशक्ती कमी झाली. दुसरीकडे लसीकरण मोहीम राबविल्यानंतर सध्या बाधित जनावरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या संसर्गाला नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने राज्यात पशुसंवर्धन विभागाने माझा गोठा - स्वच्छ गोठा ' ही मोहीम सुरू केली आहे. जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येत ( clean cowshed mission to prevent lumpy ) आहे.
लम्पी पशुपालकांना जैवसुरक्षा उपाय : या मोहिमेंतर्गत बाधित गावे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लम्पी पशुपालकांना जैवसुरक्षा उपाय व आनुषंगिक आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोहीम कालावधीमध्ये बाधित गावांमध्ये गोठा भेटी घेण्यासाठी सर्वेक्षण पत्रके तयार केली. हे पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देतील.