अमरावती -अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यात एका दलित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही महिला बेपत्ता आहे. या अत्याचार प्रकरणात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच ही महिला बेपत्ता असल्याने तिचे अपहरण करण्यात आल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मेळघाटातील दलित महिला अत्याचार प्रकरणात पोलिसांची दिरंगाई - चित्रा वाघ - मेळघाट दलित महिला अत्याचार
अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यात एका दलित महिलेवर दोन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. ही महिला बेपत्ता आहे. या अत्याचार प्रकरणात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच ही महिला बेपत्ता असल्याने तिचे अपहरण करण्यात आल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या महिलेवर दोन नराधमांकडून अत्याचार करण्यात आला होता. घटनेनंतर पीडित महिला बेपत्ता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, चित्रा वाघ यांनी पीडित महिलेच्या सासूची भेट घेतली. यावेळी त्यांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी पोलिसांना धारेवर धरत जाब विचारला. मात्र पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचं वाघ यांनी सांगितलं.
दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या सासूने धारणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र पीडित महिलेची सुरक्षा पोलिसांनी केली नाही. पीडित महिला नेमकी कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर देखील पोलिसांकडे नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.