अमरावती : एकीकडे अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यातील संत्री उत्पादक शेतकरी संत्री गळतीमुळे संकटात आहेत. त्यातच वरुड तालुक्यातील शेकडो मिर्ची उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडलेले आहेत. मोठ्या विश्वासाने शेतात लावलेले मिर्चीचे बियाणे बोगस निघाले आहेत. त्यामुळे मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटली आहे. उत्पादनही शून्य असल्याचा गंभीर आरोप या शेतकऱ्यांनी बियाणे कंपनीवर केला आहे. जवळपास दोनशे हेक्टरवरील मिर्ची पीक हातातून गेल्याने शेतकऱ्यांनी बियाणे कंपनी विरोधात थेट कृषिमंत्री दादाभुसे यांच्याकडे तक्रार केली आहे. जर नुकसान भरपाई दिली नाही तर कंपनी विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशाराही या संतप्त मिर्ची उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बहादा परिसरातील शेतकऱ्यांनी २० मे रोजी सीजेंटा कंपनीच्या मिर्ची बियाण्याच्या रोपांची लागवड आपल्या शेतात केली होती. एक महिना उलटल्यानंतर शेतकऱ्यांनी २० जूनच्या दरम्यान शेतात मिर्चीची लागवड केली. त्यानंतर खत महागडे फवारणी असे प्रत्येक शेतकऱ्यांने तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केले. परंतु अचानकच यावर्षी या मिर्चीच्या झाडांची वाढ खुंटल्याने व झाडे करपून गेल्याने मिर्चीचे पीक हातातून गेले. त्यामुळे लाखो रुपये अपेक्षित असलेल्या या मिर्ची पिकातून मात्र यंदा लावलेले पैसेही निघणार की नाही याची हमी आता राहिली नाही. दरम्यान कंपनीने बोगस बियाणे दिल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बियाणे कंपनीचा अजब सल्ला व उडवाउडवीची उत्तरं