अमरावती -अचलपूर तालुक्यातील टवलार गावात १४ वर्षीय बलिकेचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील 21 वर्षीय व्यक्ती सोबत होत होता. मात्र चाइल्डलाइन व बाल सरंक्षण कक्षाने दाखवलेल्या तत्परतेमुळे हा विवाह टळला आहे.
टवलार येथे बालविवाह होत असल्याबाबत माहिती चाइल्डलाइन क्रमांक 1098ला प्राप्त झाली होती. ही माहिती जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांना देण्यात आली. माहितीच्या आधारावर चाइल्डलाइनचे शंकर वाघमारे व बाल सरंक्षण कक्ष समुपदेशक आकाश बरवट व भूषण कावरे यांनी पथ्रोटचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस निरीक्षक आर. वसुकार यांच्या पथकासोबत टवलार गाव गाठले. त्याठिकाणी पथकाने 14 वर्षीय बालिकेचा होणार विवाह सोहळा रोखला.