महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा; युतीच्या प्रचाराचा फुटणार नारळ - joint rally

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी संत ज्ञानेश्वर भवन येथे भाजप-शिवसेना पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करणार आहेत.

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Mar 14, 2019, 10:58 PM IST

अमरावती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शुक्रवारी संत ज्ञानेश्वर भवन येथे भाजप-शिवसेना पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संमेलनाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी आज बॉम्ब शोधक पथकाने कार्यक्रम परिसराची कसून तपासणी केली.

कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना बॉम्ब शोधक पथकाचे जवान

अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनेचे खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख आणि इतर महत्वाचे पदाधिकारी या संमेलनात सहभागी होणार आहेत. या संमेलनात लोकसभा निवडणुकीत युतीच्या प्रचाराची भूमिका निश्चित केली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्योग मंत्री सुभाष देसाई येणार आहेत. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्री आणि ठाकरे हे दोघेजण स्वतंत्र विमानाने अमरावती येणार आहेत. या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने संत ज्ञानेश्वर संस्कृती भवन आणि परिसराची तपासणी केली. या संमेलनाला दोन्ही पक्षाचे विविध नेते मंडळी हजर राहणार असून सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details