अमरावती - कोरोनामुळे डबघाईस आलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी आज(मंगळवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंडी आणि कोंबड्यांचे फुकट वाटप केले.
कोंबडी आणि अंडी खाल्ल्यामुळे कोरोना होतो, या धास्तीमुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोल्ट्री व्यवसाय डबघाईस आला आहे. धुळवडीच्या दिवशी कोंबडीला मागणी नसल्यामुळे कोंबडी व्यवसाय मेताकुटीस आले आहेत. पोल्ट्री व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला असून पोल्ट्री व्यवसायिकांना आर्थिक मदत मिळावी तसेच त्यांचे मालमत्ता कर माफ व्हावा. या मागणीसाठी जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायिक आज माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.