महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीच्या चांदूरबाजारमधील चारघड प्रकल्प 'ओव्हरफ्लो'; पाणीप्रश्न मिटणार - चारघड

अमरावतीच्या चांदूरबाजारमधील चारघड धरण भरले आहे. चारगड धरणातूनच चांदूरबाजार तालुक्यात सिंचन केले जाते. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांना या प्रकल्पातील पाण्याचा फायदा होणार आहे.

चारघड प्रकल्प 'ओव्हरफ्लो'

By

Published : Aug 28, 2019, 10:50 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील सातपुडा पर्वतातून निघालेल्या नदी-नाल्यात यावर्षी भरपूर पाऊस पडत आहे. त्यामुळे यावर असलेले पूर्णा व चारघड धरण पूर्ण भरले आहे. चारघड नदीवर असलेला लघू प्रकल्प पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाला आहे. हा प्रकल्प सध्या ओसंडून वाहत आहे. त्यामुळे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी येथे आता पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. तसेच हा प्रकल्प भरल्याने तालुक्यासह परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी आता मदत होणार आहे.

चारघड धरण 'ओव्हरफ्लो'

हेही वाचा - चंद्रपूरमधील इरई धरण भरले; दोन दरवाजातून विसर्ग सुरू

अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात असलेल्या चारगड पाणी प्रकल्पातून तालुक्यात सिंचन केले जाते. त्यामुळे आगामी काळात रब्बी पिकांना या प्रकल्पातील पाण्याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पालगतच असलेल्या घाटलाडकी या गावात बारा ते पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. परंतु, आता हा प्रकल्प भरल्याने गावावरील पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे.

हेही वाचा - नंदुरबारमधील सर्व लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये 100% जलसाठा

काही वर्षापूर्वी आमदार अनिल बोंडे यांनी याच प्रकल्पातून पाणी सोडण्यासाठी आंदोलन केले होते. त्यात एका आंदोलकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याने या प्रकल्पाचे नाव राज्यभर गाजले होते. आता हा प्रकल्प पूर्ण भरला असल्याने या भागातील पाणी प्रश्न सुटणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details