महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाळेबंदीला विरोध दर्शवत दुकाने उघडणाऱ्यांवर गुन्हे दाखल

टाळेबंदीला विरोध दर्शवत आज काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना विरोध करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना घरी पाठवले.

अमरावती
अमरावती

By

Published : Mar 2, 2021, 3:53 PM IST

अमरावती- शहरासह बिजीलँड या कापड बाजारामध्येही आठ मार्चपर्यंत टाळेबंदी लागू आहे. मात्र, टाळेबंदीला विरोध दर्शवत आज काही व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना विरोध करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना घरी पाठवले.

अमरावती

अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी ८ मार्चपर्यंत वाढवली आहे. पण हा टाळेबंदीचा निर्णय चुकीची असून त्याने काहीच रुग्णसंख्या घटलेली नाही. नागरिक, कामगार, व्यापाऱ्यांचे मात्र यात प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. सोमवारी या व्यापाऱ्यांनी अमरावतीमधील टाळेबंदी उठवण्याची मागणी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे केली होती.

दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास मंगळवारपासून दुकाने उघडण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावती शहर व बिजिलँड या सर्वात मोठ्या कापड बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला असून या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details