अमरावती - मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडत असल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील २८४ हेक्टर क्षेत्रफळात पसरलेल्या ९.८७ द.ल.घ.मी, पाणीसाठा असलेले चारगड धरण हे पूर्ण क्षमतेने भरून ते आता ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या भिंतीवरून चार सेंटिमीटर पाण्याचा विसर्ग होत असून परसोडा, बेलमंडळी, घाटलाडकी, वरोळी यांसारख्या नदीकाठी वसलेल्या गावांना चारगड धरण प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणावर १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने याचा धरणाच्या परिसरातील व कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या शेतातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चारगड धरण ओव्हरफ्लो; १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार - अमरावती लेटेस्ट न्यूज
नदीकाठी वसलेल्या गावांना चारगड धरण प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या धरणावर १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने याचा धरणाच्या परिसरातील व कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या शेतातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले चारगड धरण ओव्हरफ्लो; १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
अमरावती जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघू असे एकूण ९० पाणी प्रकल्प आहे. त्यामध्ये जलसाठा ६९% टक्के आहे. यामध्ये पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे असलेले अप्पर वर्धा हे धरण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात आहे. मागील वर्षी १००% भरलेले हे धरण यावर्षी सुद्धा ८३% भरलेले आहे. मध्य प्रदेशात होत असलेल्या दमदार पावसाचा फायदा हा अमरावती जिल्ह्यातील धरणांना होत आहे. अप्पर वर्धा धरणाची वाटचाल ही पूर्ण क्षमतेने भरण्याकडे सुरू आहे.