अमरावती :सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात पर्यटकांना (Melghat Tourists) आता ह्या भागात असणाऱ्या होमस्टेचे स्वरूप पालटायला लागले आहे. अतिशय घनदाट जंगलात होम स्टे उपलब्ध होत असल्यामुळे जंगल प्रेमी पर्यटक खुश होत आहे. तसेच या भागातील आदिवासी बांधवांची देखील आर्थिक भरभराट होते आहे.
होम स्टे आणि वास्तविकता :मेळघाटात चिखलदरा सेमाडोह कोलकास या तीन ठिकाणी पर्यटक दरवर्षी मोठ्या संख्येत भेट देतात. या भागात वनविभागाच्या विश्रामगृहासह पर्यटकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने विश्रामगृहाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. चिखलदरा आणि कोलकास या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुविधा उपलब्ध असल्या तरी इतर ठिकाणी मात्र पर्यटकांना कुठे राहावे ? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. चिखलदरा येथे खाजगी हॉटेल मोठ्या संख्येत असले तरी इतर भागात मात्र पर्यटकांना मुक्काम करण्याची मोठी पंचायत होते. यावर पर्याय म्हणून वनविभागाच्या वतीने सेमाडोह आणि हरिसाल या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या घरातच पर्यटकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी स्टे होम ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी आदिवासी बांधवांना दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले (homestays in Melghat) होते.
पर्यटकांची तुफान गर्दी :मेळघाटात जाणाऱ्या पर्यटकांना शासकीय निवासाची व्यवस्था करण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावे लागते, किंवा अमरावती येथील व्याघ्र प्रकल्प कार्यालयातून ही व्यवस्था करण्याची सुविधा आहे. श्रावण महिना यासह डिसेंबर महिन्यात पर्यटकांची तुफान गर्दी मेळघाटात उसळते. अशावेळी या पर्यटकांना होम स्टे करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शासनाच्या एक ते दीड लाख रुपये अनुदानातून आदिवासी बांधवांनी आपल्या घरी होम स्टे सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिली. मात्र आदिवासी बांधवांच्या घरी अशी तात्पुरती व्यवस्था असली, तरी त्यांना पर्यटकांच्या सुविधांबाबत योग्य असे मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने पर्यटक केवळ एक रात्र काढायची, अशी गरज म्हणूनच होमस्टेचा आधार घेताना दिसतात. वास्तवात होमस्टेचा आनंद पर्यटकांना घेता यावा, अशी संकल्पनाच या भागात यशस्वी होऊ शकली नसल्याने होम स्टेही संकल्पना केवळ सेमाडोह ह्या गावातच कशीबशी उपलब्ध (nature of homestays in Melghat) आहे.
आदिवासी बांधवांसाठी आदर्श :शासनाच्या वतीने आदिवासी बांधवांना होम स्टे साठी दीड ते दोन लाख रुपये अनुदान दिले होते. या अनुदानातून आदिवासी बांधव एक किंवा दोन खोल्यांमध्ये पर्यटकांसाठी राहण्याची व्यवस्था करायचे. चिखलदरापासून 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खटकाली या गावात आंब्याच्या वनांमध्ये असणाऱ्या प्रकाश जांभेकर यांच्या शेतात देखील अशा स्वरूपाची व्यवस्था होती. जंगलात नेहमीच भेट देणारे जंगल प्रेमी माणिक धोटे यांनी या होमस्टेचा लुक बदलला तर, पर्यटक आनंदाने या ठिकाणी राहतील आणि जांभेकर यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होऊ शकेल असे लक्षात आले. यानंतर माणिक धोटे यांनी योग्य मार्गदर्शन केल्यावर प्रकाश जांभेकर यांनी देखील आपल्या होमस्टेचा लूक बदलण्याचा मानस (Melghat Tourists becomes happy ) केला.