अमरावती -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी बँकेत येताना गर्दी करू नये, त्यांच्यात सुरक्षित अंतर राहावे यासाठी बँकेच्या बाहेर सुरक्षित अंतर ठेऊन गोल आखण्यात आले, जेणेकरूण लोकांनी यात उभे राहून खबरदारी घ्यावी. पण, नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत त्या गोलांमध्ये कुणी चप्पल ठेवले, कुणी पासबुक तर कुणी थैल्या आणि आपण मात्र, झाडाच्या सावलीत उभे राहून गप्पा-टप्पा केल्या सुरू केल्या. त्यामुळे सुरक्षित अंतर राखण्याचे काम जणू यांनी चप्पल, पासबुक, थैल्यांना दिल्याचे हास्यास्पद चित्र दिसून आले.
लॉकडाऊन दरम्यान लोकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने गरिबांच्या जनधन खात्यात पैसे पाठवले आहेत. दरम्यान, आता ही रक्कम बँकेतून काढण्यासाठी मोठी गर्दी जमा होत आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील बँक ऑफ इंडियाच्या समोर असा प्रकार निदर्शनास आला.