अमरावती- यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, मूग, उडिदासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने नुकसान होऊन तब्बल दोन महिने उलटल्यानंतर आता केंद्रीय पथक राज्यात पाच दिवसांचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहे. या दौऱ्यात ते पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील नुकसानीची पथक पाहणी करत आहे. मात्र, मागील वर्षी केंद्रीय पथकाने ज्या गावात नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळाली? याची सत्यता तपासणारा हा विशेष अहवाल.
यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मागील वर्षीदेखील असेच नुकसान झाले होते. म्हणून नुकसान झाल्यानंतर तब्बल १ महिन्यांनी केंद्रीय पथक अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातील काही गावांतील नुकसानीची पाहणी केली. या गावांपैकी एक गाव म्हणजे दाभा बडनेरावरून तीन किलोमीटरवर असलेल्या दाभा गावातील रस्त्या लगतच्या शेतामध्ये या केंद्रीय पथकाने भेट दिली होती. तेव्हा केंद्रीय पथकासोबत अख्खे जिल्हा प्रशासनदेखील उपस्थित होते. या पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या पिकांची पाहणी केली. एका शेतकऱ्याच्या गोडाऊनमध्ये जाऊन खराब झालेल्या सोयाबीनची पाहणी केली. त्यानंतर आता भरघोस मदत मिळेल, अशी आशा या गावातील शेतकऱ्यांना होती. पण, एक वर्ष उलटले दुसरे केंद्रीय पथक राज्यात आले, पण मागील वर्षीच्याच नुकसानीची कवडीचीही मदत केंद्रीय पथक आल्यानंतरही मिळाली नाही. त्यामुळे हे पथक फक्त पर्यटन करायला येते का? असा प्रश्न दाभा या गावातील शेतकऱ्यांनी विचारला आहे.
एक वर्ष उलटले पण कवडीचीही मदत मिळाली नाही -