अमरावती - जिल्ह्यातील धारणी येथे शनिवारी रात्री एकात समूहातील दोन गटात वाद झाला. त्यातील एका गटाने धारणी पोलीस ठाण्यावर दगडफेक व एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शनिवारी रात्री घडलेला संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यामध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील एकूण २८ महिला व पुरुष आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
धारणी पोलीस ठाण्यावर दगडफेक; एक कर्मचारी जखमी
शनिवारी रात्री १०-३० च्या सुमारास धारणी शहरातील एकाच समूहाच्या दोन गटात तुफान वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये पोहचले. दोन्ही गटातील आरोपींनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाद घालणाऱ्या लोकांना समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली.
शनिवारी रात्री १०-३० च्या सुमारास धारणी शहरातील एकाच समूहाच्या दोन गटात तुफान वाद झाला. त्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यामध्ये पोहचले. दोन्ही गटातील आरोपींनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाद घालणाऱ्या लोकांना समज देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर याच लोकांनी पोलीस ठाण्यावर दगडफेक सुद्धा केली.
सीसीटीव्ही कॅमराचे चित्रण पाहून दोन्ही गटातील २८ आरोपींविरुद्ध पोलिंसानी विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहे. दरम्यान, सर्व आरोपी फरार असल्याने पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. दरम्यान, जिल्हा पोलीस प्रशासनकडून धारणीत दंगा नियंत्रण पथक पाठवण्यात आले आहे. सध्या धारणीत शांतता पूर्ण वातावरण आहे.