आमदार रवी राणांच्या कार्यकर्त्याने तलवारीने कापला केक, चौघांविरुद्ध गुन्हा - mla ravi rana news
संचारबंदी सुरू असताना केक कापणाऱ्यांनी मास्क लावले नव्हते. तसेच, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे गुन्हा असतानाही तलवारीने केक कापल्याप्रकरणी अश्विन उके, आकाश उके, सतीश पाटील, रितेश गवई आदी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
अमरावती - देशात कोरोनामुळे संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्याने तलवारीने भर रस्त्यात केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे. अश्विन उके असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्याने वाढदिवसाचा केक त्याच्या घरासमोरच रस्त्याच्या कडेला तलवारीने कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उकेसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.