अमरावती - निवडणुकीत अमरावती मतदार संघाचे बसपाचे उमेदवार अरुण वानखडे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरुण वानखडे यांनी परवानगी न घेता बिच्चु टेकडी परिसरातील राहुल नगर येथे ११ एप्रिलला रात्री रॅली काढून सभा घेतली. हा प्रकार जमावबंदी कायद्याचे उल्लंघन असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.
बसपाचे उमेदवार अरुण वानखडेंविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा
अरुण वानखडे यांनी परवानगी न घेता बिच्चु टेकडी परिसरातील राहुल नगर येथे ११ एप्रिलला रात्री रॅली काढून सभा घेतली.
अमरावती मतदार संघासाठी १८ एप्रिलला मतदान होत आहे. सर्व उमेदवार आपल्यापरीने निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. बसपाचे उमेदवार अरुण वानखडे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परवानगी न घेता ११ एप्रिलला राहुल नगर येथे रॅली काढली. रॅलीनंतर प्रचारसभा घेऊन निवडून देण्याचे आवाहनही केले. त्यांच्या या कृत्याने जमावबंदी कायद्याचे उल्लंनघन होऊन आदर्श आचारसंहितेचा भंग झाला. त्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी अरुण वानखडे यांच्या विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला.