महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळी विशेष : अमरावतीत कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत - deewali dastur nagar amravati celebration

दिवाळीच्या पर्वावर मातीचे किल्ले बनविण्याची जुनी परंपरा कायम राहावी, या उद्देशाने श्रीविठ्ठल आनंद सरस्वती फिरते वाचनालय, दस्तुर नगर सेवा समिती, विदर्भ मलखांब असोसिएशन आणि जगद्गुरू महर्षी व्यास शिक्षण संस्थेच्या वतीने कल्पक किल्ले बनवा स्पर्धा आणि प्रदर्शन मागील 24 वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी आज (सोमवारी) सकाळपासून पावसाचे वातावरण असताना आणि पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असतानाही बच्चे कंपनी मोठ्या उत्साहात शेण, माती आणि विटांनी आपल्या कल्पकतेने किल्ले बनविण्यात रंगून गेले.

अमरावतीत कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत

By

Published : Oct 28, 2019, 3:26 PM IST

अमरावती - दिवाळीच्या निमित्ताने मोबाईल, फोन, टीव्ही यातून बाहेर पडून खेळण्याचा बघण्याचा नवा अनुभव यावा, या उद्देशाने कल्पक किल्ले बनविण्यासाठी चिमुकले शेण आणि मातीत रंगले. शहरातील दस्तुर नगर परिसरात देशपांडे लेआउट येथे हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. आजची पिढी ही मातीत खेळावी, मातीने भरावी, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजनाचे प्रमुख सुनील पांडे यांनी सांगितले. गेल्या 24 वर्षांपासून सलग हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अमरावतीत कल्पक किल्ल्यांच्या निर्मितीसाठी चिमुकले रंगले मातीत

हेही वाचा -ऐन दिवाळीत अमरावतीत मुसळधार पाऊस, व्यावसायावर परिणाम होण्याची शक्यता

दिवाळीच्या पर्वावर मातीचे किल्ले बनविण्याची जुनी परंपरा कायम राहावी, या उद्देशाने श्रीविठ्ठल आनंद सरस्वती फिरते वाचनालय, दस्तुर नगर सेवा समिती, विदर्भ मलखांब असोसिएशन आणि जगद्गुरू महर्षी व्यास शिक्षण संस्थेच्या वतीने कल्पक किल्ले बनवा स्पर्धा आणि प्रदर्शन मागील 24 वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी शुक्रवारी सकाळपासून पावसाचे वातावरण असताना आणि पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असतानाही बच्चे कंपनी मोठ्या उत्साहात शेण, माती आणि विटांनी आपल्या कल्पकतेने किल्ले बनविण्यात रंगून गेले. शहरातील देशपांडे लेआउट येथील गोंडबाबा मंदिरालगतच्या मैदानावर हा उपक्रम राबविण्यात आला.

हेही वाचा -अमरावतीत दिवाळीसाठी बाजारपेठ सजल्या, चिनी लायटिंगला लोकांची ना पसंती

गुरुवारी किल्ले बनविण्यासाठी चिमुकल्यांना जागा ठरवून देण्यात आली. सकाळी साडेसात वाजल्यापासून आपल्या कल्पकतेने नुसार किल्ले बनविण्यासाठी परिसरासह विविध भागातील छोटी मुले एकत्र आली. याठिकाणी मुलांना माती शेण आणि पाणी उपलब्ध करून देण्यात आली. किल्ल्यांना रंग भरण्यासाठी रंग साहित्य चिमुकल्यांनी आणले होते. स्पर्धकांनी घडविलेल्या उत्कृष्ट किल्ल्यांसाठी रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रही आयोजकांच्या वतीने दिले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details