अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी आरोपी मनोज मोहन मेश्राम (४५, रा. उपराई, ता. दर्यापूर) याच्या विरुद्ध विनयभंग आणि पोक्साेअन्वये गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक करण्यात आली असल्याचे गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी सांगितले.
अशी घडली घटना: गाडगेनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एका महिलेच्या घरी तिच्या बहिणीच्या दोन अल्पवयीन मुली पाहुणपणाने आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी मावशीकडे गार्डनमध्ये खेळायला जाण्याचा आग्रह धरला. शुक्रवारी, 26 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या मुली गार्डनमध्ये खेळत होत्या. त्यावेळी तेथील एका बेंचवर बसलेल्या आरोपीने त्या दोघींपैकी एकीला जवळ बोलावले. त्याने त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ त्या मुलीला दाखविला. या दरम्यान त्या विकृताने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ही बाब मुलींनी मावशीला सांगितली.
चार दिवस पहिली त्याची वाट:मुलींनी ही बाब सांगताच तिच्या मावशीने दोन-तीनदा गार्डनला जाऊन त्या विकृताचा शोध घेतला. मात्र, तो दिसला नाही. दरम्यान, 31 मे रोजी दुपारी पुन्हा त्या मुली त्याच गार्डनमध्ये गेल्या. तेव्हा तो विकृत त्यांना दिसून आला. त्यामुळे मुलींच्या मावशीसह त्यांची आईदेखील तेथे लगबगीने पोहोचली. चिमुकल्या मुलींनी त्या विकृताकडे अंगुलीनिर्देश करत अश्लील कृत्य करणारा हाच तो, असल्याचे सांगितले.
लोकांनी पकडून दिला चोप:मुलींना आपल्याबाबत महिलांना काहीतरी सांगितले, असे ध्यानात येताच त्या विकृताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही युवक व वाहनचालकांनी त्याला पकडले. यानंतर त्याला चोपदेखील देण्यात आला. पीडित मुलींच्या आई व मावशीने त्याला पकडून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणले. येथे पोलिसी खाक्या दाखवताच विकृताने स्वत:ची ओळख मनोज मेश्राम, अशी सांगितली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
- Pune Crime : फक्त प्रसिद्धीसाठी तोतया IAS अधिकारी जायचा विविध कार्यक्रमांना; जाणून घ्या काय आहे प्रकरण
- Pune Crime : धक्कादायक! मटण केले नाही म्हणून पत्नीवर जीवघेणा हल्ला
- Firing On Folk Singer : प्रसिद्ध भोजपुरी लोकगायिका निशा उपाध्यायवर गोळीबार; माथेफिरुने स्टेजवरच गोळी झाडल्याने गायिका गंभीर