अमरावती- कोरोना संसर्गाने देशभर खळबळ उडाली आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांना अहोरात्र बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहेत. त्यामुळे जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यावसायिकाने पोलीस ठाण्याला सॅनीटायझर टनल भेट दिली. त्यामुळे ठाण्यात येणाऱ्या पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनतेच्या रक्षणासाठी पोलीस रस्त्यावर.. कृतज्ञता व्यक्त करत व्यावसायिकाने पोलीस ठाण्याला दिली 'ही' मोठी 'भेट' - Lockdown
जनतेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यावसायिकाने पोलीस ठाण्याला सॅनीटायझर टनल भेट दिले. सॅनीटायझर टनल आल्याने कर्मचारी खूश दिसत आहेत.
![जनतेच्या रक्षणासाठी पोलीस रस्त्यावर.. कृतज्ञता व्यक्त करत व्यावसायिकाने पोलीस ठाण्याला दिली 'ही' मोठी 'भेट' Sanitizer Tunnel](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6798092-thumbnail-3x2-amtachl.jpg)
अचलपूर पोलीस ठाण्याला येथील युनिक सोलर सिस्टीमच्या वतीने सॅनिटायझर उपकरण भेट देण्यात आले. या सॅनिटायझर टनलला पोलीस ठाण्याच्या मुख्य द्वारासमोर लावण्यात आलेले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात प्रवेश करणारे जवान सॅनीटाईज होऊन आतमधे येईल, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोलीस प्रशासन अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटत असताना त्यांनाच कोरोनाबाबत सुरक्षेची साधने अत्यल्प असल्याची बाब येथील युनिक सोलर सिस्टिमच्या संचालकांच्या लक्षात आली. त्यांनी आज सकाळी बारादरम्यान पोलीस प्रशासनाला सॅनिटाईझर टनल भेट दिले. त्यामुळे येथील पोलीस प्रशासनाचे कर्मचारी कोरोनापासून आपणही सुरक्षीत असल्याची भावना पोलिसांची झाली आहे. सॅनीटायझर टनल आल्याने कर्मचारी खूश दिसत आहेत. ठाणेदार सेवानंद वानखडे यांनी नागरिकांना व आपल्या कर्मचार्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.