अमरावती: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 41 दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी ही संपावर ( ST Workers Strike ) गेले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केल्यानंतरही एसटी कर्मचारी हे एसटीचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करावे, या मागणीसाठी ठाम आहेत. 41 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अमरावती जिल्ह्यातही 41 दिवसांपासून एसटीचे चाक थांबले (Amaravati District Bus Service ) आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत, असं असलं तरी मात्र अमरावतीच्या वरूड आणि मोर्शीमधील नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला ( Comfort To Passengers Amaravati ) आहे. कारण वरुड, मोर्शी आगारातील काही कर्मचारी दहा दिवसापूर्वी कामावर परतल्याने येथील एसटीच्या चार ते पाच फेऱ्या अमरावतीसाठी सुरू झाल्या ( Warud Morshi Depot Bus Started ) आहेत. अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी हे एकमेव आगार आहे. तेथील बससेवा काही अंशी सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे..
अमरावतीचा विचार करता आतापर्यंत 345 एसटी कर्मचारी हे कामावर परतले असले तरीही, अजून दोन हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी आहेत. शासनाने त्यांना कामावर येण्याबाबत सांगितले. मात्र अजूनही कामावर न आलेल्या जिल्ह्यातील २१ कर्मचाऱ्यांना शनिवारी पहिल्यांदाच बडतर्फीची नोटीस एसटी प्रशासनाच्या वतीने ( ST Workers Suspended ) बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यामध्ये संप अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात एकूण 2 हजार 444 कर्मचारी