अमरावती -दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर धडकली. ही घटना परतवाडा मार्गावरील भूगावजवळ घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या अपघातात 12 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
अमरावती : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा अपघात, 12 प्रवासी जखमी - bus accident near bhugaon
अमरावतीच्या भूगावजवळ एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात 12 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
जीवघेणे रस्ते अन् अपघात...
परतवाडा-अमरावती मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. या मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहे. या खड्यांच्या दुरुस्तीचे काम एकतर्फा सुरू आहे. एसटी बसचालक प्रवीण रामदास वाघ हे परतवाडा आगाराची बस घेऊन प्रवाशांना अमरावतीकडे आणत होते. त्याचवेळी भूगावनजीक अचानक एक दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने आला. बसचालकाने बस सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात एसटी बसचे चाक गेल्याने बस झाडावर आदळली. या अपघातात 12 प्रवाशांना दुखापत झाल्याने त्यांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.