महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिवसा येथे जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी गेलेली गाडी खाक - amravati fire update

जंगलात लागलेल्या आगीला विझविण्यासाठी गेलेली नगरपंचायत अग्निशामक दलाची गाडी जळून खाक झाली आहे. मात्र नवी 75 लाख रुपयांची ही गाडी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

तिवसा जंगल आग
तिवसा जंगल आग

By

Published : Mar 31, 2021, 4:12 PM IST

Updated : Mar 31, 2021, 4:18 PM IST

अमरावती -तिवसा नजीक जंगलात लागलेल्या आगीला विझविण्यासाठी गेलेली नगरपंचायत अग्निशामक दलाची गाडी जळून खाक झाली आहे. मात्र नवी 75 लाख रुपयांची ही गाडी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जळाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावेळी स्थानिक विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत.

75 लक्ष रुपयांची तरतूद

तिवसा तालुक्यात अग्निशामक वाहन नाही. वित्त आयोग निधीतून अग्निशामक दलाचा ठराव सर्वसाधारण सभेत घेण्यात आला, त्यामध्ये 75 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली असताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी पल्लवी सोटे बांधकाम व पाणीपुरवठा विभाग नगरपंचायतच्या सर्व विभागाने शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून या अग्निशामक दलाची खरेदी बेकायदेशीरपणे केली, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

गाडीच्या जळण्यामागे अनेक प्रश्न उपस्थित

जंगलाला आग लागल्याने तिवसा नगरपंचायतची गाडी आग विझवण्यासाठी गेली होती, असा आरोप माजी नगरसेवक भूषण यावले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप शापामोहन, माजी सरपंच धनराज थुल यांनी केला आहे. सदर अग्निशामक गाडीच्या जळण्यामागे अनेक प्रश्न या निमित्ताने विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

Last Updated : Mar 31, 2021, 4:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details