अमरावती - शहरातील नमुना परिसरात जीर्ण झालेली ३ मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मात्र नमुना परिसरात खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अमरावतीच्या नमुना परिसरातील ३ मजली इमारत कोसळली, जीवितहानी नाही - building collapsed
अमरावती शहरातील नमुना परिसरात जीर्ण झालेली ३ मजली इमारत शुक्रवारी रात्री कोसळली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे मात्र नमुना परिसरात खळबळ उडाली आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील नमुना परिसरातील तीन मजली इमारतीत फक्त आटा चक्की होती. जुनी असणारी ही इमारत जीर्ण व मोडकळीस आली होती. शुक्रवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही इमारत अचानक कोसळल्याने खळबळ उडाली. ही इमारत प्रकाश लुंगीकर यांच्या कपडे प्रेस करण्याच्या दुकानावर कोसळल्याने लुंगीकर यांच्या दुकानातील वॉशिंग मशीनसह इतर साहित्यांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरसेवक अजय सारस्कार आणि लवलीना हर्षे घटनास्थळी धावून आले. त्यानंतर महापालिकेचे आपत्ती निवारण पथक, अग्निशामक दल आणि शहर कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस पथक नमुना परिसरात दाखल झाले. यानंतर परिसरात कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम महापालिका प्रशासनाने झपाट्याने हाती घेतले आहे, तर शहरातील जीर्ण व मोडकडीस आलेल्या इमारती त्वरित खाली कराव्यात, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.