अमरावती- मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे अमरावतीवरून मोर्शीकडे व मोर्शीकडून अमरावतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. दरम्यान, वाहतूक ही निंभी, वाथोडा मार्गे वळवण्यात आली आहे.
मध्यप्रदेशला जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल गेला वाहून; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु - वाहतूक बंद
लेहगाववरून काही अंतरावर सध्या एका पुलाचे काम चालू आहे. दरम्यान, नदीला मोठा पूर आल्याने तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे या महामार्गवरील वाहतूक बंद झाली आहे. वाहतूक ही निंभी, वाथोडा मार्गे वळवण्यात आली आहे.

अमरावती
मध्यप्रदेशला जाणाऱ्या अमरावती मोर्शी महामार्गावरील पूल गेला वाहून; वाहतूक बंद
अमरावती ते मोर्शी या महामार्गाचे काम हे पूर्ण झाले आहे. दरम्यान, लेहगाववरून काही अंतरावर सध्या एका पुलाचे काम चालू आहे. दरम्यान, नदीला मोठा पूर आल्याने तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे. यामुळे या महामार्गवरील वाहतूक बंद झाली आहे. या भागात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरुच आहे.
Last Updated : Jul 29, 2019, 7:02 PM IST