अमरावती- आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालेली आहे. जिल्ह्यातील मोझरी येथील नवरदेव दिनेश शेळके या तरुणाचा आज विवाह आहे. विवाहाच्या या दिवशी अतिशय व्यस्त असतानासुद्धा मतदान केंद्रावर रांगेत उभे राहून त्याने मतदानाचा हक्क बजावला.
अमरावतीच्या मोझरीत नवरदेवाने सकाळी बजावला मतदानाचा हक्क - mozri booth
अत्यंत व्यस्त असतानाही दिनेशने मतदानाचा हक्क बजावत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क
मोझरीत नवरदेवाने बजावला मतदानाचा
दिनेश या तरुणाने आज सकाळीच मतदान केंद्रावर हजेरी लावली. शिवाय रांगेत उभे राहून त्यांने शिस्तीत योग्य प्रक्रियेनुसार मतदान केले. अत्यंत व्यस्त असतानाही मतदान हा केवळ हक्क नसून ते आपले कर्तव्यही आहे, असे सांगत त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.