अमरावती -विवाह सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा अविस्मरणीय ठरावा याकरिता लग्न सोहळ्यात काही तरी हटके करण्याचा सगळेच जण प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न एका तरुणीने आपल्या लग्नात केला आहे.तिवसा येथील नववधू आपल्या लग्न सोहळ्यात पाच वृक्ष सासरी घेऊन गेली आहे. तिने आपल्या लग्नातील वऱ्हाड्यांना मला आशीर्वाद देण्यापेक्षा किमान एक झाड लावा, असा संदेश दिला आहे.
अमरावतीच्या एका मंगल कार्यालयात नीलिमा शंकरराव लाडिस्कर रा. तिवसा या तरुणीचा विवाह सोहळा हिंगनघाटच्या सीतेज मानकर यांच्याशी झाला आहे. नीलिमा लाडिस्कर ही नववधूने आपल्या माहेरमधून पाच वृक्ष आपल्या सासरी घेऊन गेली आहे.