अमरावती - विजयादशमीनिमित्त अमरावतीमधील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी विविध खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. दसरा मैदानात झालेला हा सोहळा पाहण्यासाठी अमरावतीकरांनी गर्दी केली होती.
विजयादशमी महोत्सवात खेळाडूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके - विजयादशमी उत्सव अमरावती
विजयादशमीनिमित्त अमरावतीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब आणि रोप मलखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
![विजयादशमी महोत्सवात खेळाडूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4693298-thumbnail-3x2-amara.jpg)
प्रात्यक्षिक सादर करताना खेळाडू
विजयादशमीनिमित्त अमरावतीमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
हेही वाचा - व्यंगचित्राच्या माध्यमातून बच्चू कडूंचा भाजपवर 'प्रहार
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंनी मल्लखांब आणि रोप मलखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. सोबतच तलवारबाजी, दांडपट्टा, लेझीम, झुंबा अशा विविध क्रीडा प्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली.