महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अचलपूरमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट, एक ठार तर एक गंभीर जखमी - Amravati Crime News

अचलपूर तालुक्यातल्या खैरी - सावळापूर फाट्याजवळ सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्रतिबंध प्रदीप पवार असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Bomb blast in Achalpur
अचलपूरमध्ये गावठी बॉम्बचा स्फोट

By

Published : Nov 9, 2020, 4:45 PM IST

अमरावती-अचलपूर तालुक्यातल्या खैरी - सावळापूर फाट्याजवळ सोमवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक जण ठार तर, एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. हे दोघे दुचाकीवरून गावठी बॉम्ब घेऊन जात असताना या बॉम्बचा स्फोट झाला.

प्रतिबंध प्रदीप पवार वय 22 (रा. खैरी दोनोडा) असे मृताचे, तर अनिकेत सारंग भोसले 25 असे गंभीर जखमीचे नाव आहे. जखमी तरुणावर असेगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या बॉम्बच्या आवाजाने तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी हे गावठी बॉम्ब लावण्यात येतात. मात्र शिकार न मिळाल्यास पुन्हा हे गावठी बॉम्ब घरी नेले जातात. असाच गावठी बॉम्ब घरी घेऊन जात असताना हा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details