महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एकलविहीरच्या जंगलात सापडले दोघांचे मृतदेह - जंगलात सापडले दोघांचे मृतदेह

एकलविहीरच्या जंगलात दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

bodies of the two were found in the forest of Ekalvihir
एकलविहीरच्या जंगलात सापडले दोघांचे मृतदेह

By

Published : May 24, 2021, 8:00 PM IST

अमरावती- एकलविहिर गावालगतच्या जंगलातून इंधन गोळा करून घरी आणण्यासाठी गेलेल्या दोघांचे मृतदेह लागोपाठ रविवार आणि सोमवारी आढळून आले. बापूराव आहाके (वय-55) आणि शामराव कुसराम (वय-60) अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही एकलविहिर येथील रहिवासी आहेत.

गावात भीतीचे वातावरण -

या दोघांना कुणी मारले तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारनंतर पुन्हा सोमवारी सुध्दा एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता बळावली आहे. तेंदुपत्ता गोळा करणाऱ्यांना हे मृतदेह आढळुन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेंदुरजनाघाट पोलीस व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांचे पंचनामे केले. या घटनांमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांनंतर आदीवासी बांधव जंगालात जाण्यासाठी घाबरत असल्याचे बोलले जात आहे.

आहाके डिसेंबर महिन्यात तर कुसराम चार दिवसांआधी झाले बेपत्ता -

बापूराव आहाके हे मागील डिसेंबर महिन्यापासून घरून निघून गेल्याची तक्रार शेंदुरजनाघाट पोलिसांत त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. मात्र, त्यांचा शोध पोलिसांना लागला नाही, शेवटी कुटुंबियांनी पोलिसांची परवानगी घेऊन बापूरावचा शोध सुरू केला. मात्र, त्यांचा पत्ता लागलेला नाही. रविवारी दुपारी १२च्या दरम्यान एकलविहीरच्या जंगलात गावातील काही मजूर तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेले असता बापूरावचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. घटनेची माहीती शेंदुरजनाघाट पोलीसांना देण्यात आली. पोलीस व वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामा करून त्या मृतदेहाचे जोगवरच शवविच्छेदन केले. ही घटना ताजी असतानाच मागील चार दिवसांपासून पुन्हा याच जंगलात बेपत्ता झालेला शामराव कुसराम याचा मृतदेह सोमवारी सकाळी एकलविहीरच्या जंगालात आढळून आला. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांसमोर पेच -

अशा घटना का होत आहेत, याचा शोध घेण्याचे पोलसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरही या घटनेमुळे आव्हान निर्माण झाले आहे. या दोघांना कुणी मारले तर नाही अशी शंका निर्माण झाली आहे. जर कुणी मारले नसेल तर या दोघांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details