अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेत, अमरावतीमधील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान राज्यातील इतर विद्यार्थ्यांनी देखील रक्तदान करावे असे आवाहन या विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले.
अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबीर - विद्यार्थ्यांनी केले रक्तदान अमरावती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेत, अमरावतीमधील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केले रक्तदान
राज्यातील रक्तपेढीमध्ये केवळ 7 ते 8 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे रक्ताअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून मुख्यमंत्र्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये शिक्षकांसोबत मुलांनी देखील रक्तदान केले. तसेच प्रत्येक महाविद्यालयात अशा प्रकराचे रक्तदान शिबिर आयोजीत करून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे आवाहनही संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.