महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपचे विचार खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले - बाळासाहेब थोरात - bjp

यांचे विचार किती खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत अंधश्रद्धेच्या पलीकडचा विचार आम्ही करतो. सर्वांना सोबत घेवून जाण्याची ताकद आमच्यात आहे.

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष कॉंग्रेस

By

Published : Aug 26, 2019, 6:33 PM IST

Updated : Aug 26, 2019, 8:18 PM IST

अमरावती - भाजपचे दिवंगत नेते माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात खासदार साध्वी प्रज्ञा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विरोधकांच्या काळ्या जादूमुळे भाजपच्या नेत्यांचा मृत्यू होत असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही साध्वी प्रज्ञासह भाजपवर जोरदार टीका केली. एटीव्ही भारत शी बोलताना ते म्हणाले भाजपचे विचार खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले आहेत.

भाजपचे विचार खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले - बाळासाहेब थोरात

प्रज्ञासिंह या भाजपचे प्रतिनिधित्व करत आहे. इतके मोठे व्यक्तिमत्त्व जे खासदार म्हणून तिथे आहे. आणि ते असे विचार मांडत आहे. यांचे विचार किती खालच्या पातळीचे आणि अंधश्रद्धेने बरबटलेले आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत अंधश्रद्धेच्या पलीकडचा विचार आम्ही करतो. सर्वांना सोबत घेवून जाण्याची ताकद आमच्यात आहे. अशा प्रकारे कुणी बोलत असेल तर त्याचा सर्वांनी निषेध केला पाहिजे. हा भाजपचा विचार आहे जो त्यांनी मांडला आहे ही वस्तुस्थिती आहे. असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

Last Updated : Aug 26, 2019, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details