अमरावती- शहराचे नवे महापौर म्हणून भाजपचे चेतन गावंडे निवडून आले आहेत. तर उपमहापौर म्हणून कुसूम साहू यांनी या निवडणुकीत बाजी मारली. निवडणुकीनंतर महापालिकेच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल वाजवून जल्लोष केला.
आज सकाळी ११ वाजता अमरावती महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापौर पदासाठी भाजपचे चेतन गावंडे यांच्या विरोधात एमआयएमचे अफझल हुसेन मुनारक हुसेन आणि बसपाच्या माला देवकर या उमेदवार होत्या. हात उंचावून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. चेतन गावंडे यांना ४९, अफझल हुसेन मुनारक हुसेन यांना २३ तर माला देवकर यांना ५ मते मिळाली.
उपमहापौर पदासाठी भाजपच्या कुसुम साहू, बसपाच्या इशरत बानो मन्नान खान आणि एमआयएमचे मोहमद साबीर यांच्यात लढत होती. या निवडणुकीत कुसुम साहू यांना ४९, इशरत बानो यांना ५ आणि मोहमद साबीर यांना २३ मते मिळाली. निवडणूक प्रक्रियेनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी चेतन गावंडे यांची महापौर तर उपमहापौर म्हणून कुसुम साहू यांची निवड झाल्याची घोषणा केली.
काँग्रेसची एमआयएमला साथ -