अमरावती - हरीसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आज भाजपाने आक्रमक भूमिका घेत, व्याघ्र प्रकल्प कार्यालतात आंदोलन छेडले आहे. अपर प्रधान उपवनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभारी अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक प्रवीण चव्हाण आणि उपसंचालक खैरनार यांना दलनाबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत भाजपा कार्यकर्त्यांनी वनाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.
प्रभारी अपर प्रधान उपवनसंरक्षक प्रवीण चव्हाण हे उपवनसंरक्षक खैरनार यांच्या दालनात पोहोचले तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी रेड्डी यांचे देखील निलंबन करण्यात यावे अशी त्यांच्याकडे मागणी केली. यावेळी प्रवीण चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांना कॉल करून रेड्डींविरोधात काही अहवाल असेल तर पाठवा अशी विनंती केली. मात्र यावेळी आक्रमक झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हरी बालाजी यांच्यावर देखील आरोप केले. शिवकुमार यांना पोलीस कोठडीत अतिशय सन्मानाची वागणूक मिळत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
वनबल प्रमुख व्ही.साई प्रसाद यांच्या विरोधात घोषणाबाजी