महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप जिल्हा परिषद सदस्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - bjp zp member

धारणी तालुक्यातील सीमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या सचिवांना मोहोड यांनी ५० हजारांची मागणी केली होती. त्यातील २० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

bribe
भाजप जिल्हा परिषद सदस्याला २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

By

Published : Feb 4, 2020, 11:40 PM IST

अमरावती - भाजपचे जिल्हा परिषद आणि समाजकल्याण समिती सदस्य शरद मोहोड यांना २० हजार रुपयाची लाच घेताना अटक करण्यात आली. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : अॅड. उज्ज्वल निकम पीडितेच्या बाजूने न्यायालयात लढणार - गृहमंत्री

धारणी तालुक्यातील सीमाडोह येथील जय महाकाली शिक्षण संस्थेच्या मुलींच्या वसतिगृहासाठी अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी त्यांनी पैसे मागितल्याचे समोर आले आहे. या संस्थेच्या संचालकांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. या संस्थेच्या सचिवांना त्यांनी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील २० हजारांचा पहिला हफ्ता स्वीकारताना त्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

हेही वाचा - "शरद पवार अजूनही तरुण आहेत, २०२४ ला पंतप्रधान होऊ शकतात"

ABOUT THE AUTHOR

...view details