महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकार स्थापनेचे भाजप कार्यकर्त्यांकडून स्वागत, अमरावतीत फटाके फोडून आनंद व्यक्त - ncp bjp

उप महापौर कुसुम साहू, नगरसेवक तुषार भारतीय, नूतन भुजाडे, प्रमिला जाधव, जयश्री डहाके, राधा कुरील, अजय सारस्कार, स्वाती कुलकर्णी, सुनील काळे, बाळू भुयार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, शिल्पा पाचघरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

जल्लोष करताना कार्यकर्ते

By

Published : Nov 24, 2019, 3:42 AM IST

अमरावती - महिनाभराच्या नाट्मय घडामोडीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादी - भाजपचे सरकार स्थापन झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अमरावती शहरात या सत्तास्थापनेचे स्वागत करण्यात आले. ढोलताशे वाजवून आणि फटाक्यांची आतीषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

कार्यकर्त्यांनी अमरावतीत जल्लोष केला

राजपेठ येथील पक्ष कार्यालयासमोर सायंकाळी महापौर चेतन गावंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सूर्यवंशी, शहर अध्यक्ष जयंत डेहनकार यांच्या उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला. काही कार्यकर्त्यांनी नाचून आनंद व्यक्त केला.

हेही वाचा -'भाजपने लोकशाहीला ठार मारण्याची सुपारी घेतली', रणदीप सुरजेवाला यांचे टिकास्त्र

उप महापौर कुसुम साहू, नगरसेवक तुषार भारतीय, नूतन भुजाडे, प्रमिला जाधव, जयश्री डहाके, राधा कुरील, अजय सारस्कार, स्वाती कुलकर्णी, सुनील काळे, बाळू भुयार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, शिल्पा पाचघरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details