अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा संधी मिळावी, यासाठी शहर भाजपने आज विजय संकल्प दुचाकी रॅली काढली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले.
अमरावतीत भाजपची विजय संकल्प दुचाकी रॅली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राजापेठ, राजकमल, चित्रा चौक, पठाण चौक, व्हिएमव्ही, गाडगेनगर, इर्विन चौक या मार्गाने ही रॅली निघाली.
राजापेठ येथील शहर भाजप कार्यालयासमोरून दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. पालकमंत्री प्रवीण पोटे, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, भाजप शहर अध्यक्ष जयंत डेहनकर, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले.
राजापेठ, राजकमल, चित्रा चौक, पठाण चौक, व्हिएमव्ही, गाडगेनगर, इर्विन चौक या मार्गाने ही रॅली निघाली. या रॅलीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व अधोरेखीत करण्यात यश आले आहे. यामुळे पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वातले भाजप सरकार पुन्हा केंद्रात विराजमान करण्याचा संकल्प या बाईक रॅलीद्वारे भाजप कार्यकर्त्यांनी केला.