अमरावती -पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज पहिली जिल्हा नियोजन बैठक घेतली. या बैठकीत मंचावर महापौरांसाठी खुर्ची नसल्यामुळे भाजपच्या सदस्यांसह आमदार सुलभा खोडके यांनी आक्षेप नोंदवला. यावेळी ठाकूर यांनी जिल्हा नियोजन भवनातील आपल्या कार्यालयाचे उद्घाटनही केले.
पालकमंत्र्यांच्या बैठकीत मंचावर महापौरांची खुर्ची नसल्याने भाजपने नोंदवला आक्षेप - पालकमंत्री यशोमती ठाकूर अमरावती
बैठकीत विषयांना सुरुवात होणार तोच भाजपचे नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी मंचावर महापौरांसाठी खुर्ची नाही. ते माझ्या बाजूला बसले आहेत. हे योग्य नाही, असे म्हणत रोष व्यक्त केला. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नकळत अशी चूक झाली असेल, असे म्हणत महापौर चेतन गावंडे यांना मंचावर आमंत्रित केले.
सभा मंचावर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख आणि जिल्हाधिकारी शैलेश नवाल विराजमान झाले. यावेळी प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, बडनेराचे आमदार रवी राणा आणि मूर्तीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, बैठकीत विषयांना सुरुवात होणार तोच भाजपचे नगरसेवक बाळासाहेब भुयार यांनी मंचावर महापौरांसाठी खुर्ची नाही. ते माझ्या बाजूला बसले आहेत. हे योग्य नाही, असे म्हणत रोष व्यक्त केला.
भाजपच्या सदस्यांनीही या प्रकाराबाबत विरोध करण्यास सुरुवात केली. यावेळी, आमदार सुलभा खोडके यांनीही जिल्हा परिषद अध्यक्षांना मंचावर स्थान मिळत असताना आमच्या शहराचे प्रतिनिधी असणाऱ्या महापौरांना मंचावर खुर्ची नसणे योग्य नाही, असे म्हणत आक्षेप नोंदवला. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नकळत अशी चूक झाली असेल, असे म्हणत महापौर चेतन गावंडे यांना मंचावर आमंत्रित केले.