अमरावती -वर्धा नदीत मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) अकरा जणांचा बुडून दुर्दैवी अंत झाला. ही घटना अतिशय गंभीर असून या घटनेत दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत शासनाने जाहीर करावी, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) जिल्हा प्रशासनाला पत्र दिले.
डॉ. मुंडे यांनी केला पालकमंत्र्यांचा निषेध
वर्धा नदीत अकरा जणांचा बुडून मृत्यू झाला असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या गंभीर घटनेची दखल घेऊन त्वरित घटनास्थळी पोहोचायला हवे होते. मात्र, या घटनेची साधी दखलही पालकमंत्र्यांनी घेतल नाही, असा आरोप करत अनिल बोंडे यांनी निषेध नोंदवला.