अमरावती - गांधी हे कुटुंब नाहीतर भारताचे डीएनए आहेत. सोनिया यांनी जर मनावर घेवून विचार केला असेल तर राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं पाहिजे. भारताला राहुल गांधींची गरज आहे; अशा आशयाचे ट्विट राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ केले होते. यावरुन भाजपचे डॉ. अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकुरांवर टीका केली आहे.
अमरावतीत रंगला ट्विटर वॉर; भाजप नेते बोंडेंची मंत्री यशोमती ठाकुरांवर टीका
'गांधी कुटुंब तुमचा डीएनए असू शकतो. परंतु, आम्हा भारतीयांचा राम, कृष्ण, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. फिरोज बाटलीवाला नव्हे' असे ट्विट केल्याने अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये आज ट्विट वार दिसून आले आहे.
'गांधी कुटुंब तुमचा डीएनए असू शकतो. परंतु, आम्हा भारतीयांचा राम, कृष्ण, शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. फिरोज बाटलीवाला नव्हे', असे ट्विट केल्याने अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यांमध्ये आज ट्विट वार दिसून आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष बदलासाठी काँग्रेसच्या २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. त्यावर ट्विट करून काँग्रेस नेते राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसमधील नेत्यावर टीका केली होती. त्यानंतर यशोमती ठाकुरांनी राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होते, आता त्या ट्विटला भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
TAGGED:
Bjp vs congress twitter war