अमरावती :अचलपूर मतदार संघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडूयांना बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद (MLA Bachchu Kadu and MLA Rana dispute) विकोपाला न्यायचा आहे. हे त्यांचे नवे नाटक असल्याचा आरोप बच्चू कडू यांचे कट्टर विरोधक आणि चांदूरबाजार तालुक्याचे भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी केला (Gopal Tirmare criticizes MLA Bachchu Kadu) आहे.
मतदार संघातील प्रश्न सोडविण्यास अपयशी :बच्चू कडू हे मतदार संघातील शेतकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनता शेतकरी आणि शेतमजुरांचे लक्ष विचलित करण्यासाठी आमदार रवी राणा यांच्यासोबतचा वाद विकोपाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अचलपुर तालुका तसेच चांदूरबाजार तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून शेतकरी मोठ्या संख्येत वंचित राहिले आहेत. हे बच्चू कडू यांचे अपयश असून याचा परिणाम त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत असल्याचे गोपाल तिरमारे यांनी म्हटले (Gopal Tirmare criticizes) आहे.