महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amravati BJP Agitation : चांदूर बाजारात भाजपचे 'दफन आंदोलन', रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी - BJP Funeral Agitation in Amravati

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पांदण रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराच्या ( Chanduir Bazae Road Corruption ) चौकशीच्या मागणीवरून भाजप कार्यकर्त्यांनी ( Amravati BJP Agitation In Chandur Bazar ) दफन आंदोलन ( BJP Funeral Agitation ) केले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पावित्रा पाहत तहसीलदारांनी यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनाने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले.

funeral agitation
funeral agitation

By

Published : Jun 5, 2022, 10:24 AM IST

अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील पांदण रस्त्याच्या ( Chanduir Bazae Road Corruption ) कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणी दखल न घेणाऱ्या प्रशासनाविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी ( Amravati BJP Agitation In Chandur Bazar ) येथे दफन आंदोलन ( BJP Funeral Agitation ) सुरू केले. कार्यकर्त्यांचा आक्रमक पावित्रा पाहत तहसीलदारांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप -अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात झालेल्या पांदण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या सर्व कामांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, शासनाच्या मंजूर आराखड्यानुसार सर्व पांदण रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी चांदूर बाजार भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करण्याचा इशाराही भाजपतर्फे देण्यात आला होता. मात्र, प्रशासन राजकीय दबावात आपल्या मागणीची कोणतीही दखल घेत नसल्याचा आरोप करीत भाजप कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी पांदण रस्त्यावर अर्ध दफन आंदोलन सुरू केले होते.

दफन आंदोलनामुळे खळबळ -चांदूर बाजार तालुक्यात अनेक ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करून पांदण रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पण ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अल्पावधीतच रस्ते दिसेनासे झाले. कंत्राटदारांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले नाही. शिवाय कामे सुरू असताना या कामाची पाहणीही करण्यात आली नाही. असे असतानाही कंत्राटदारांची देयके मात्र मंजूर करण्यात आली. या गैरप्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांनी या कामांच्या चौकशीची मागणी केली होती. त्यासोबतच 2022-2023 च्या आराखड्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचीही मागणी भाजपने केली होती. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अधिकारी रात्री पोचले -दिवसभर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू होते. मात्र, प्रशासनातर्फे आंदोलकांकडे कोणीही फिरकलेच नाही. अखेर रात्री आठ वाजता प्रभारी जिल्हाधिकाऱ्याांनी दखल घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर तहसीलदारांनी पांदण रस्ते बांधकामाची चौकशी करण्याचे व पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनात चांदूर बाजार तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

हेही वाचा -लवकरच पावसाच्या सरी बरसणार; हवामान विभागाचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details