अमरावती -गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यात रेमडेसीवर इंजेक्शनच्या घोटाळयाची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच जिल्हा शल्यचिकीत्सक हेच या घोटाळ्याचे मास्टरमाईंड आहेत, असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे. दरम्यान हे सर्व आरोप चुकीचे आणि तथ्यहीन आहेत. अशा प्रकारचे आरोप करून प्रशासनाला बदनाम करण्यात येत आहे. समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचे काम या आरोपांमधून करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया या आरोंपावर शासकीय कोविड रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. रुपेश खडसे यांनी दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यामध्ये तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील अधीक्षक डॉ. पवन मालुसरेसोबत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. श्यामसुदंर निकम सुध्दा सहभागी आहेत. या घोटाळ्याचे मास्टरमाईंडच ते आहेत. घोटाळ्यात त्यांचा मुलगा अमित श्यामसुदंर निकम याचा देखील सहभाग आहे. अशाप्रकारचे गंभीर आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केले आहेत.
निवेदिता चौधरी यांच्या आरोपामुळे खळबळ