अमरावती -कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू दिल्लीला निघाले आहेत. बच्चू कडू यांचे हे आंदोलन भाजपाच्या चांगलेच जिव्हारी लागले असून बच्चू कडू हे शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. आज बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात भाजपा जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.
बच्चू कडूंच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याचा प्रयत्न -
बच्चू कडू विरोधात आंदोलन करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी कार्यकर्त्यांसह पोहोचल्य होत्या. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांच्या घरासमोर बेशरमचे झाड लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप कार्यकर्ते पोलीस यांच्यात जोरदार खंडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी स्वतःला शेतकरी नेते समजून शेतकरी हिताचा कायद्याला ते विरोध करत आहे. ही नौटंकी करून त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी भाजपाने केला. यावेळी पोलिसांनी भाजप जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या आंदोलनावेळी बेलोरा गावात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.
हेही वाचा - आता देश अशांत झाल्याशिवाय राहणार नाही; उद्याच्या बैठकीत केंद्राने 'हा' निर्णय जाहीर करावा - शेट्टी