महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bjp Abhivadan Yatra अमरावतीतून दुचाकीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गावी निघाली अभिवादन यात्रा, राहुल गांधींना देणार उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) वारंवार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Swatantra Veer Savarkar ) यांच्यावर टीका करतात. याला उत्तर देण्यासाठी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ( Bjp Abhivadan Yatra Start From Amravati ) कार्याबाबत नव्या पीढीला जाणीव होण्यासाठी भाजपच्या वतीने अभिवादन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा अमरावती येथून दुचाकीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भगूर या गावापर्यंत काढण्यात येणार आहे.

Bjp Abhivadan Yatra Amravati
स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ अभिवादन यात्रा

By

Published : Jan 7, 2023, 2:27 PM IST

अमरावती -शहरात भाजपच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Swatantra Veer Savarkar ) यांच्या नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या जन्म गावापर्यंत शनिवारी 50 दुचाकी स्वारांची अभिवादन यात्रा ( Bjp Abhivadan Yatra Start From Amravati ) निघाली. राजकमल चौक येथे या अभिवादन यात्रेला माजी मंत्री आणि आमदार डॉ. रणजीत पाटील, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री भूपेंद्र कोठेकर आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी भगवा झेंडा दाखवला. या अभिवादन यात्रेतून राहुल गांधींना उत्तर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ अभिवादन यात्रा

स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ अभिवादन यात्राभारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अतिशय महत्त्वाचा वाटा असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Swatantra Veer Savarkar's Village ) यांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची नव्या पिढीला जाणीव व्हावी, यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीरांच्या स्मरणार्थ अमरावती शहरातून थेट नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या भगूर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्म गावापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती अभिवादन यात्रेचे आयोजक माजी नगरसेवक अजय सारसकर यांनी दिली. या अभिवादन यात्रेत एकूण 25 दुचाकींवर प्रत्येकी दोन असे 50 जण सहभागी झाल्याचेही अजय सारसकर म्हणाले. या यात्रेचे बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला तसेच समोर सर्वच शहरांमध्ये स्वागत केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ही अभिवादन यात्रा राहुल गांधींना उत्तरराहुल गांधी सारखा व्यक्ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ( Bjp Abhivadan Yatra For Reply To Rahul Gandhi ) यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतो. मात्र ते त्यांचाच चेहऱ्यावर पडत असल्याचे त्यांना लक्षात येत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सावरकरांबाबत चुकीचे विधान करणाऱ्या राहुल गांधी यांना उत्तर देण्यासाठी आमचा युवा कार्यकर्ता अजय सारसकर याने ही अभिवादन यात्रा काढली आहे. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श यात्रा आहे, असे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला केले अभिवादनअमरावती ते भगूरपर्यंत दुचाकीद्वारे अभिवादन यात्रा सुरू होण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी श्याम चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी आमदार रामदास आंबटकर, आमदार प्रताप अडसड, भूपेंद्र कोठेकर, भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर, माजी महापौर चेतन गावंडे भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, भाजपचे माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय, दिनेश सूर्यवंशी, चैनसुख संचेती, माजी नगरसेवक सुरेखा लुंगारे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details