अमरावती -देशातील चार राज्यांमध्ये बर्ड फ्लू संकट असतानाच आता राज्यातही अनेक ठिकाणी कोंबड्या दगावत आहेत. अमरावतीच्या बडनेरा येथील चाळीस कोंबड्या या दोन दिवसांपूर्वी दगावल्या आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. यादरम्यान बर्ड फ्लू आल्याची चर्चा असल्याने चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे अंड्याच्या आणि चिकनच्या दरात अमरावतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
आधीच देशावर कोरोनाचे सावट असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट हे घोंगावत आहे. सुरुवातीला कोरोना हा कोंबड्यामुळे होत असल्याची अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातून पोल्ट्री व्यवसायिक हे हळूहळू सावरत असतानाच आता बर्ड फ्लू आल्याची अफवा पसरत असल्याने पुन्हा एकदा हा व्यवसायासमोर संकट उभे राहिले आहे.
अमरावतीत बर्ड फ्लूची धास्ती : मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात घसरण - बर्ड फ्लूचा परिणाम पोल्ट्री व्यवसायावर न्यूज
अमरावतीच्या बडनेरा येथील चाळीस कोंबड्या या दोन दिवसांपूर्वी दगावल्या आहे. परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणे बाकी आहे. दरम्यान बर्ड फ्लू आल्याची चर्चा असल्याने चिकन आणि अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे.
बर्ड फ्लूची धास्ती : अमरावतीत मागणी घटल्याने कोंबडी तसेच अंड्यांच्या दरात घसरण