अमरावती- अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान गुरुदेवनगरमधील गतिरोधकाजवळ अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे समजते. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
अमरावतीत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची दुचाकीला धडक; दोन गंभीर जखमी - 'अमरावती बातमी
भरधाव ट्रकने (एम एच 40/वाय 5366) त्यांना जोरदार धडक दिली. यात तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकी ट्रकने फरफटत नेली. सुदैवाने यातील तरुण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यामुळे कुठलीच हानी झाली नाही. जखमींना तत्काळ श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवले.
शुभम रामचंद्र लांजेवार (वय 22 वर्ष),सुरज संतोषराव तायडे(22 वर्ष) हे आपल्या (एम एच 27 सी जे1678) दुचाकीने गतिरोधक ओलांडून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एम एच 40/वाय 5366) त्यांना जोरदार धडक दिली. यात तब्बल 100 फुटापर्यंत दुचाकी ट्रकने फरफटत नेली. सुदैवाने यातील तरुण रस्त्याच्या कडेला फेकले गेले. त्यामुळे कुठलीच हानी झाली नाही. जखमींना तत्काळ श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात प्रथमोपचारासाठी पाठवले होते. तेथुन त्यांना अमरावती सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी तिवसा पोलीस पुढील तपास करत आहेत.